« Back

प्रेक्षणीय स्थळे

   

                 नागांव हे गाव अलिबाग - रेवदंडा ह्या मार्गामधील असलेले प्रसिद्ध गाव आहे. ह्या गावला अंदाजे 3 कि.मी लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. या समुद्र किना-याला साताड बंदर म्हणतात. येथील वैशिष्ट म्हणजे किना-याजवळील एका रांगेत असणारी, डौलदार डुलणारी सुरूची झाडे व रूपेरी वाळूचा स्वच्छ , सुंदर समुद्रकिनारा त्यावर फेसाळणा-या अथांग समुद्राच्या पांढ-या शुभ्र लाटा पर्यटकांना फारच मोहीत करतात.

                तसेच नागांव मध्ये नऊ नाग मंदिर, दक्षिण मुखी मंदिर, नागेश्र्वर मंदिर, वंखनाथ मंदिर, भिमेश्र्वर मंदिर, तसेच महालक्ष्मी मंदिर आहेत.

                नागांव या गावात दर गुरूवारी आठवड्याचा बाजार भरतो. हा बाजार चिंचेच्या गोळ्यासाठी प्रसिद्ध आहे.